Athani

अथणी येथे काँग्रेस नेत्याची निर्घृण हत्या

Share

अथणी तालुक्यातील खिलेगाव गावात काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांचे निकटवर्तीय अण्णाप्पा बसप्पा निंबाळ यांची रस्त्याच्या मधोमध शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील खिलेगाव गावच्या हद्दीत अण्णाप्पा बसप्पा निंबाळ यांची हत्या करून हल्लेखोर फरार झाले आहेत. अण्णाप्पा हे खिलेगाव कृषी शेतकरी संघ सहकारी संघाचे अध्यक्ष होते. ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली. हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

Tags: