Hukkeri

हुक्केरी कोर्टाच्या वाचनालयात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Share

हुक्केरी शहरातील न्यायालयाच्या आवारातील ग्रंथालयात महिला वकिलाच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हुक्केरी न्यायालयात घडली.

वकील अनिता कुलकर्णी यांचे पती लगमण्णा होसुरे (वय ४८) हे मद्यपी असून त्यांना गेल्या एक आठवड्यापासून डॉक्टरांनी दारू पिऊ नका असे सांगितले होते, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडली होती व ते नैराश्यग्रस्त झाले होते. त्यांनी हुक्केरी न्यायालयाच्या वाचनालयाच्या एका खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली .

हुक्केरीचे पीएसआय अभिजीत अक्कतंगेरहाळ घटनास्थळी दाखल झाले व गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे .

Tags: