दुचाकी चोराला अटक करून , त्याच्याजवळील ,2,95,000/- रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली जप्त काण्यात घटप्रभा पोलिसांना यश आले आहे .

घटप्रभा पोलीस स्टेशनचे पीएसआय एम . बी. बिरादार हे दांडापूर क्रॉस येथे तपास करत असताना नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल चालवणाऱ्या एका संशयित आरोपीस पकडून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. व चौकशी केली असता त्याने अनेक ठिकाणाहून एकूण 08 मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले . त्याच्या ताब्यातील 2,95,000/- रुपये किमतीच्या एकूण 08 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत .
आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर प्रकरणात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गोकाकचे डीएसपी एच.डी.मुल्ला , घटप्रभा पीआय बसवराज कमनबैल व पीएसआय गुन्हे शाखा म.बी. बिरादार , पीएसआय एस.आर.कणवी आणि तपासात सहभागी झाले होते . या सर्वांचे बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले आहे.


Recent Comments