शाळेतून आलेल्या मुलीवर माकडाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना धारवाडच्या गरग गावात घडली.माकडाच्या हल्ल्याचे भीषण दृश्य स्थानिक सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
धारवाड तालुक्यातील गरगागावात राहणारी इकरा गडकरी (८) ही जखमी विद्यार्थिनी माकडाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे . गावातील शासकीय उर्दू मुलींच्या शाळेतील २ रीच्या वर्गात शिकत आहे . शाळेतून परतत असताना एका माकडाने विद्यार्थिनीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. माकडाचा हल्ला झाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी मुलीच्या बचावासाठी धाव घेतल्याने माकड घटनास्थळावरून पळून गेले .

गावकऱ्यांनी तातडीने ह्या मुलीला स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले . माकडाच्या हल्ल्याची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
माकडाच्या हल्ल्याने विद्यार्थ्यासह स्थानिकांना धक्का बसला. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करीम . डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना गरग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, वनविभागाने या माकडाला पकडून जंगलात सोडून द्यावे अशी मागणी केली जात आहे .


Recent Comments