धारवाड जिल्ह्यातील कलघटगी तालुक्यातील सिंगनळ्ळी वनपरिक्षेत्रात दिसून आलेल्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कलघटगी तालुक्यातील सिंगनळ्ळी वनपरिक्षेत्रात नागरी वस्ती प्रदेशात बिबट्या दिसून आला होता. गावकऱ्यांना बिबट्याने अनेकदा दर्शन दिल्याने लोक घाबरले होते. बिबट्या दिसल्याने शेतात जाण्याची भीती असलेल्या शेतकऱ्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर या ठिकाणी पिंजरा लावला होता.

तरीही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु ठेवले होते. अखेर वनविभागाने ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्या सापडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.


Recent Comments