Hukkeri

विकासकामे बंद करून हमी देण्यासाठी सिद्दरामय्यांची धडपड : आ. निखिल कत्ती

Share

भाजप सरकारने सुरु केलेली सर्व विकासकामे बंद करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या हमीभाव देण्यासाठी धडपड करत असल्याचा आरोप हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी केला.

संकेश्वर येथे आज मागासवर्गीय कल्याण विभागाच्या मॅट्रिकोत्तर विद्यार्थिनींसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे 3 कोटी रुपयांच्या अनुदानातून बांधलेल्या होस्टेलचे उद्घाटन त्यांनी केले. यावेळी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता एस एस पट्टणशेट्टी आणि कंत्राटदार पुंडलीक नंदगावी यांनी नूतन आमदारांचे स्वागत करून सत्कार केला.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निखिल कत्ती म्हणाले की, दिवंगत उमेश कत्ती यांच्या विशेष प्रयत्नातून गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी वसतिगृह सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा विद्यार्थिनींना व्हावा.

त्यानंतर ते म्हणाले की, कर्नाटकातील सिद्धरामय्या यांचे सरकार भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांना रोखून द्वेषाचे राजकारण करत आहे. विकासकामे बंद पाडून त्यांनी जाहीर केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार धडपडत आहे. हे सरकार 5 वर्षे चालणार नाही असे ते म्हणाले.

यावेळी मागासवर्गीय कल्याण अधिकारी महांतेश उरवळगीन, अभियंता प्रभाकर कामत, बंडू हतनूरे, संतोष मुडशी, शंकर हेगडे, सुनिल पर्वतराव आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: