हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना भाजपचे तिकीट नाकारल्याने बनजिग समाजाच्या नेत्यांनी याला विरोध करत निदर्शने केली.
जगदीश शेट्टर हे साधे गृहस्थ आहेत. कोणताही कलंक न लावून घेत त्यांनी राजकारण केले. त्यांना भाजपकडून तिकीट न देते डावलण्याचा प्रयत्न झाला आहे. जगदीश शेट्टर यांना तिकीट न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू करावा लागेल, असा इशारा बनजिगा समाज कल्याणकारी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. बाइट आपल्या समाजाने राज्यात मुख्यमंत्री म्हणून ७ जणांचे योगदान दिले आहे.
अशा समाजाचे एक प्रभावी नेते म्हणजे जगदीश शेट्टर. शेट्टर यांच्याबाबत हलके बोलणाऱ्या आमदारावर भाजप हायकमांडने कोणतीही कारवाई केली नाही. शेट्टर यांना तिकीट मिळाल्यास आमच्या समाजाला हिंसक लढा द्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.


Recent Comments