State

बेंगळुरूच्या पूरनियंत्रणासाठी मोठी मोहीम; विश्वबँकेच्या मदतीने नाल्यांच्या विकासकामांना प्रारंभ

Share

विश्वबँकेच्या सहकार्याने बेंगळुरूच्या पूरनियंत्रणासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून, गुंजूर येथे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते नाल्यांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. पावसाळ्यातील पूरस्थिती रोखणे आणि शहराची जलसुरक्षा मजबूत करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील गुंजूर येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी नाल्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले. विश्वबँकेच्या आर्थिक सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘कर्नाटक जलसुरक्षा आणि आपत्ती प्रतिकारक्षमता कार्यक्रमांतर्गत’ ही कामे करण्यात येणार आहेत. भूमिपूजनानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटनही झाले.

यावेळी महसूलमंत्री कृष्णा बैरेगौडा, राज्यसभा सदस्य मन्सूर अली खान, स्थानिक आमदार मंजुळा अरविंद लिंबावळी, विधानपरिषद सदस्य ए. पी. रंगनाथ, माजी मंत्री एच. नागेश तसेच जीबीएचे मुख्य आयुक्त महेश्वर राव यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: