State

बेंगळुरू टेक समिटमधून जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देण्याचा प्रयत्न

Share

बेंगळुरू येथे आयोजित प्रतिष्ठित ‘बेंगळुरू टेक समिट’चे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत देश-विदेशातील नामवंत उद्योजक, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध देशांचे मान्यवर सहभागी झाले आहेत.

मंगळवारी बेंगळुरू येथील बीआयईसीमध्ये या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी परिषदेचे उद्घाटन करून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्याचे आयटी-बीटी आणि गृह विभागाचे मंत्री प्रियांक खर्गे, लघुपाटबंधारे तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री अजय सिंह, किओनिक्सचे अध्यक्ष शरत बच्चगौडा आणि आयटी-बीटी विभागाच्या सचिव मंजुळा उपस्थित होत्या.

या परिषदेत दक्षिण कोरियाचे उपमंत्री सेंगवान मोक, मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष पुनीत चंडोक, ली-डी-फ्रान्स प्रादेशिक परिषदेच्या अध्यक्ष व्हॅलेरी पेक्रेस, उद्योजिका किरण मजुमदार-शॉ, क्रिस गोपालकृष्णन यांच्यासह विविध देशांचे राजदूत आणि उद्योजक सहभागी झाले होते.

उद्घाटनानंतर मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट दिली. यावेळी त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके पाहिली.

Tags: