बेळगाव येथील नेहरू नगरातील डॉ. व्ही. डी. पाटील सभागृहात एनएसएस कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षण व पुनश्चेतन कार्यशाळेचे उद्घाटन कित्तूर राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सी. एम. त्यागराज यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना प्रा. त्यागराज यांनी एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, शिस्त, कौशल्य विकास आणि राष्ट्रप्रेम रुजविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी केवळ शिक्षक न राहता युवकांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शक बनावे आणि प्रशिक्षणातील ज्ञानाचा महाविद्यालयांमध्ये उपयोग करून समाजाभिमुख उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. केएलई उच्च शिक्षण व संशोधन अकादमीचे कुलगुरू डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी युवकांच्या क्षमतेचा समाजविकासासाठी उपयोग करण्यावर भर दिला. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्य जागृती आणि ग्रामीण विकासात स्वयंसेवकांना सक्रिय करण्याचे आवाहन केले.

एनएसएस प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालक प्रा. जी. बी. शिवराजू यांनी बदलत्या काळानुसार एनएसएसच्या कार्यपद्धतीत नवे उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. सहायक संचालक डॉ. के. एम. वीरय्या यांनी विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारी विकसित करण्यासाठी कार्यक्रम अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात एनएसएस गीताने झाली. डॉ. कनकप्प पूजारी यांनी स्वागत केले, तर डॉ. अश्विन नरसण्णवर यांनी आभार मानले.


Recent Comments