Hukkeri

एससी, एसटी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेत अदा करा : बी. कल्लेश

Share

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वेळेत अदा करा अशा सूचना समाजकल्याण खात्याचे सहसंचालक बी. कल्लेश यांनी दिल्या.

हुक्केरी तालुका पंचायत सभागृहात सर्वसाधारण बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा प्रगती आढावा घेऊन बोलताना त्यांनी तालुक्यातील अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती वेळेवर अदा करण्यात यावी, याकडे लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

त्यांनी तालुक्यातील नवजात बालकांच्या मृत्यूबाबत व अंगणवाडीतील बालकांना पोषण आहाराबाबत माहिती दिली तसेच अंगणवाडी सेविकांना बाल आरोग्याबाबत प्रशिक्षण देऊन बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे सांगितले.
व्यासपीठावर तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी उमेश सिदनाळ, व्यवस्थापक नीळकंठ कुलकर्णी, आरोग्य प्रचारक जी. ए. करगुप्पी उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी विविध विभागीय अनुष्ठान अधिकारी व ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांकडून प्रगतीची माहिती घेतली.

यावेळी अनुसूचित जाती अधिकारी जयश्री गोटुरी, जिल्हा पंचायत अभियंता एस. के. पाटील, कृषी संचालक महादेव पटगुंदी, सीडीपीओ मंजुनाथ परसन्नवर, वनाधिकारी सज्जन आदी उपस्थित होते.

Tags: