Crime

शौचालयाच्या जागेच्या भांडणातून एकाचा पाडला मुडदा

Share

शौचालयाच्या जागेच्या मुद्द्यावरून एका व्यक्तीची तिघांनी निर्घृण हत्या केली. ही घटना विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील किलारहट्टी गावात घडली.


होय, शौचालयाच्या जागेच्या भांडणातून किलारहट्टी गावात एकाचा मुडदा पाडण्यात आलाय. 55 वर्षीय मरगू पांड्रे असे दुर्दैवी मृताचे नाव आहे. बिरू, मलप्पा आणि आणखी एकाने अशा तिघांनी त्यांचा खून करून पळ काढल्याचा आरोप पांड्रे कुटुंबीयांनी केला आहे. तसेच शौचालयाच्या जागेच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये अनेक दिवस भांडण होते. आता तिघांनी मिळून मरगू पांड्रे याला ठार केले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. या प्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Tags:

murder-for-toilet-matter/