Nippani

जमीन प्रकारात न्याय द्या.. अन्यथा 01 नोव्हेंबरला आत्मदहन करणार….अब्दुलरशीद शेख

Share

कोगनोळी येथील सर्व्हे क्रमांक 757 या जमिनीची बोगस वारसा डायरी बनविण्यात आली आहे . ऑनलाईन उतारेही गायब झाल्याचे दिसून येते . गैरप्रकार उघडकीस आल्यावर आपण याबद्दल रीतसर तक्रार देऊन प्रशासनाकडे दाद मागितली आहे . मात्र याप्रकरणी माझ्यावर मोठ्याप्रमाणात अन्याय झाला असून प्रशासनाने न्याय द्यावा . शिवाय संबंधित दोषी अधिकारी , कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी , व प्रशासकीय अधिकारी लक्ष घालून मला न्याय मिळवून द्यावा 01 नोव्हेंबर पर्यंत मला जमिनीसंदर्भात झालेले फसवणुकीत निपाणी तहसीलदार कार्यालयाकडून न्याय मिळाला नाही तर ? बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा मैनूदिन अब्दुलरशीद शेख व मोहब्बतकी अब्दुलरशीद शेख यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे …

यासंदर्भात निपाणी ग्रामीण पोलिसातही तक्रार दाखल केली आहे . मात्र त्यावरही निकाल झालेला नाही . कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने लेखी माहिती मागवली तरी त्यावर उत्तर आले नाही . अखेर माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केल्यावर कोरोनाचे कारण देण्यात आले आहे…
एखाद्या गरीब शेतकऱ्याची निपाणी तहसील कार्यालयाकडे वारंवार फसवणूक होत आहे, व प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शेख यांनी माध्यमांसमोर केलेला आहे…… या शेती प्रकरणात त्वरित न्याय मिळवून देण्याची मागणी शेख हे करीत आहेत…..

Tags:

nippani atmdahan