Belagavi

कर्नाटकातही काटामारी टाळण्यासाठी संगणकीय प्रणाली हवी : राजू शेट्टी

Share

महाराष्ट्रातील जयसिंगपूर येथे लवकरच २१वी ऊस परिषद होणार आहे. या परिषदेत काटामारी टाळण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करावा, उसाला प्रतिटन एफआरपी सोबत अतिरिक्त २०० रु दयावेत आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज बेळगावात दिली.

बेळगावात शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या तुलनेत कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनात काटामारी मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रात काटामारी टाळण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करून त्याचा पासवर्ड आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला दिलेला असतो. त्यामुळे उसाच्या वजनात फसवणूक करता येत नाही. कर्नाटकात देखील हीच पद्धत अवलंबावी अशी आमची मागणी आहे. महाराष्ट्रात सुमारे २०० साखर कारखाने आहेत. कर्नाटकात १००-१२५ असतील. पण येथे ही पद्धत लागू नसल्याने उसाच्या वजनात काटामारी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. ती टाळण्यासाठी कर्नाटक शासनानेही महाराष्ट्राच्या धर्तीवर संगणकीय वजन प्रणाली कारखान्यांना सक्तीची करावी अशी मागणी शेट्टी यांनी केली.

गेले वर्ष साखर उद्योगाला फायद्याचे गेले आहे. देशात साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. सुमारे १२५ लाख टन साखर निर्यात केली आहे. त्यामुळे कदाचित दिवाळीत देशालाच साखर कमी पडेल म्हणून केंद्र सरकारने ऑगस्टमध्येच साखर निर्यातीला बंदी घातली आहे. त्याशिवाय इथेनॉल, मोलॅसिसचे उत्पादन घेऊन साखर कारखाने नफा मिळवत आहेत. त्यामुळे एफआरपी अधिक २०० रुपये देण्याची मागणी आम्ही केली आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांनाही एफआरपी दिलेला आहे. मात्र अधिकचे २०० रु दिलेले नाहीत. ते तातडीने द्यावेत अशी मागणी शेट्टी यांनी केली. बाईट
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags:

rajushetty belgaum pressmeet