Belagavi

बेळगावमध्ये रंग संपदाच्या वतीने परिसंवाद

Share

बेळगाव शहरात रंग संपदा तर्फे “सेतू मातु आणि युगांतर” या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील कन्नड साहित्य भवन येथे बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात प्रसिद्ध सिनेअभिनेते एस एन सेतुराम यांनी सहभाग घेतला होता.

मानवी जीवनाच्या मूल्यावर आधारित या परिसंवादात विचार व्यक्त करण्यात आले. मनुष्य फुलांच्या हाराचा वापर झाल्यानंतर तो हार कचऱ्यात फेकून देतो. मनुष्याला कचऱ्याचाही वापर करता येतो. मात्र कचऱ्याचा वापर करण्याऐवजी कचरा वाढविण्याचे काम माणसाकडून होत असल्याचे ते म्हणाले. मनुष्याने आपल्या जीवनाची मूल्ये जपत मनुष्य जन्म कसा सार्थकी लावावा, या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले.

यावेळी आर व्ही पाटील, डॉ. ए एल कुलकर्णी, गुरुनाथ कुलकर्णी, पद्मा कुलकर्णी, दिलीप माळगी, वीणा हेगडे, अशोक कुलकर्णी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags:

belagavi belgaum ranga sampad