भारत जोडो काढणार्या काँग्रेसचे सत्व हरवले आहे. काँग्रेसने भारत जोडो सोडून आधी काँग्रेस जोडो यात्रा काढावी, अशी खिल्ली भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली यांनी उडवली.
बेळगावात आज, सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत विरोधी पक्षाला त्यांचे कार्य करण्यास कोणताही अडथळा नसतो. पण अस्मिता गमावून बसलेल्या काँग्रेसला आधी पक्षाची एकजूट करण्याची गरज आहे. काँग्रेसचे देशभरातील दिग्गज नेते आज पक्ष सोडत आहेत. देशात काँग्रेस वेडी झाली आहे. अशा परिस्थितीत ते भारत जोडो यात्रा करत आहेत. भारताच्या विभाजनाचे श्रेय काँग्रेसला जाते. काँग्रेसनेच सर्वप्रथम भारताचे विभाजन केले. भारत-चीन युद्धात भारताचा काही भाग चीनला देण्याचे श्रेय काँग्रेसला जाते. जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते. त्यामुळे काँग्रेसवाल्यानी आधी काँग्रेस जोडो करावा असे ते म्हणाले.
दरम्यान, त्यांनी काँग्रेसच्या ‘पे सीएम’ मोहिमेबद्दल माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना जिरली म्हणाले की, पे सीएम ही काँग्रेस कंपूने तयार केलेली खोटी बातमी आहे. यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेलमध्ये घोटाळा झाल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर कागदपत्रांशिवाय बोलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले. आता पे सीएमच्या मुद्यावरूनही काँग्रेस खोट्या अफवा पसरवून राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे. पीएसएमच्या प्रचारातून काँग्रेसने देशात राज्याची प्रतिमा मलीन करत आहे. राज्यात ४० टक्के कमिशन झाल्याचे पुरावे त्यांनी द्यावेत असे आव्हान त्यांनी काँग्रेस नेत्यांना दिले. राज्यात भ्रष्टाचाराला वाव देणारे काँग्रेस प्रेरीत आहेत.
राज्य काँग्रेस अध्यक्ष बेकायदेशीर पैशांसंदर्भातील एका प्रकरणात तुरुंगात गेले आहेत. हा विषय संपूर्ण राज्यातील जनतेला माहीत आहे. याला राज्यातील जनता आगामी निवडणुकीत चोख उत्तर देईल, असेही ते म्हणाले. बाइट


Recent Comments