Belagavi

प्रशासन, अधिकाऱ्यांनी जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे आमदार सतीश जारकीहोळी यांचा आग्रह

Share

गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पूरस्थिती ओढवत असून या वर्षी देखील पुन्हा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुन्हा पूर येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, अधिकारी आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी जनतेच्या समस्यांना प्राधान्य द्यावे, असा आग्रह आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केलाय.

बेळगाव शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासन, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पालकमंत्र्यांनी पूर परिस्थितीसंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लवकरात लवकर पूर परिस्थितीसंदर्भात अवलोकन करावे, असे जारकीहोळी म्हणाले.

जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, शाळा, रस्त्यांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, सातत्याने ओढवणाऱ्या पूर परिस्थितीसंदर्भात उपाययोजना करावी, असा आग्रह त्यांनी केलाय. ()

सिद्धरामोत्सव कार्यक्रमासंदर्भात बोलताना ते म्हणाले, हा सिद्धरामोत्सव कार्यक्रम नसून सिद्धरामय्या यांच्या ७५ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम आहे. सिद्धरामय्या समर्थकांनी या कार्यक्रमाची तयारी केली होती मात्र या कार्यक्रमात पक्षातील सर्व नेते सहभागी होणार असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

काँग्रेस पक्षात दुफळीचे राजकारण सुरु आहे का? या प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना जारकीहोळी म्हणाले, सिद्धरामोत्सव कार्यक्रमाच्या नावाखाली काही लोक बिनबुडाचे आरोप करत आहेत. मात्र काँग्रेस पक्षात एकजूट असून कोणतेही दुफळीचे राजकारण सुरु नसल्याचे ते म्हणाले.

Tags: