हायकमंडच्या निर्णयानुसार डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री म्हणून आणि मी उपमुख्यमंत्री म्हणून पुढील दोन वर्षे राज्यात जबाबदार सरकार चालवणार आहोत, अशी घोषणा जी. परमेश्वर यांनी बेळगाव येथे केली.

निवडणूक जाहीरनाम्यातील सर्व ५९२ आश्वासने पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “पुढच्या वेळी मुख्यमंत्री म्हणून येणार का?” या प्रश्नावर त्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम असल्याचे सांगत पुढील दोन वर्षांचे सत्तासूत्र स्पष्ट केले. जाहीरनाम्यातील बहुतांश अल्पकालीन योजना यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी सिंचन क्षेत्र वाढवण्यावर सरकारचा भर असून, नवीन उद्योगांना कर सवलत आणि जमीन दिली जाईल, असे ते म्हणाले. ‘गृहज्योती’साठी जात प्रमाणपत्राच्या सक्तीची आपल्याला माहिती नसून जुनेच नियम लागू राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हेमावती लिंक कॅनॉल प्रकल्पाला विरोध करणाऱ्या काँग्रेस आमदारांची समजूत काढून काम पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


Recent Comments