Belagavi

बबन भोबे मित्र मंडळाकडून शालेय साहित्याचे वाटप

Share

सामाजिक बांधिलकी जपत बेळगावमधील गवळी गल्ली येथील शाळा क्रमांक २२ मधील गरीब विद्यार्थ्यांना बबन भोबे मित्र मंडळ, विमल फाउंडेशन आणि समृद्धी फाउंडेशन यांच्या वतीने छत्र्यांसह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विमल फाउंडेशनचे संयोजक किरण जाधव आणि बबन भोबे यांनी विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप केले. याचवेळी गोंधळी गल्लीतील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. धीरज दिनकर पाटणेकर यांनी विद्यार्थ्यांना छत्र्या उपलब्ध करून दिल्या, तसेच समृद्धी फाउंडेशनच्या वतीने बादल्या व घड्याळांचे वाटप करून मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले.

अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेल्या या सेवा कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून एफ. एल. कदम, मंदा नेवगी, सुहास शिंदे, शशिकांत मांजरेकर, वैजनाथ पाटील, संतोष पुरोहित, युवराज खंडागळे, कृष्णा पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags: