Dharwad

काँग्रेस नेते फैयाज पठाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

Share

धारवाड येथील माळापूर भागातील हाश्मी नगर येथे १० एप्रिल रोजी झालेल्या काँग्रेसचे युवा नेते फैयाज पठाण यांच्या निर्घृण हत्या प्रकरणातील १४ वा आरोपी इस्माईल तमाटगार याला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस फैयाज पठाण यांच्या घरात घुसून त्यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी धारवाड उपनगर पोलिसांनी दोन टप्प्यांत १३ जणांना अटक केली होती. हत्येचा कट रचल्याचा आरोप असणारा इस्माईल तमाटगार पोलिसांना गुंगारा देऊन परदेशात पळून गेला होता. फैयाज यांच्या नातेवाईकांनी एक ऑडिओ क्लिप जारी करत हत्येमागे इस्माईलचा हात असल्याचा आरोप केला होता. परदेशातूनच वकिलामार्फत केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण करून हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठाने अखेर त्याला जामीन मंजूर केला आहे.

Tags: