Banglore

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मांडला जुन्या-गळक्या बसचा मुद्दा

Share

बेळगाव आणि ग्रामीण परिसरात कालबाह्य झालेल्या जुन्यागळक्या बस सोडण्यात येत असल्याचा मुद्दा बेळगाव ग्रामीणच्या . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज विधानसभेत मांडला. नव्या बस सोडण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

 

बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण भागात जुन्या-गळक्या आणि वापरास अयोग्य ठरविण्यात आलेल्या बस सोडण्यात येत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले. यासंदर्भात केएसआरटीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार करूनही काहीच फायदा झालेला नाही. ७ लाख किमी धावल्यानंतर कालबाह्य झालेल्या बस असल्याची येथे चर्चा सुरु आहे. आमच्याकडे ९ लाख किमी धावलेल्या बस सोडण्यात येत आहेत. केएसआरटीसीच्या एमडीनी माझ्या मतदारसंघात अशा ६५ बसेस असल्याचे सांगितले आहे. विध्यार्थी आणि पालक याबाबत माझ्याकडे तक्रार करतात. आम्ही प्रयत्न करूनही नव्या बस येत नसल्याने त्यांना आम्ही काहीच काम करत नाही असे वाटते. याबाबत त्वरित कार्यवाही करून नव्या बसेस सोडाव्यात अशी मागणी आ. हेब्बाळकर यांनी केली.

यावर उत्तर देताना परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू म्हणाले, राज्यात सुमारे २४ ते २५ हजार बसेस धावताहेत. चारही परिवहन मंडळातील खेडोपाडी बससेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघातील जुन्या बसच्या समस्येवर जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.

एकंदर बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जुन्या बसचा मुद्दा आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मांडला आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन परिवहनमंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिले आहे. ते कधी पूर्ण होते हे पहावे लागेल.

 

Tags: