Banglore

बेंगळुरात सर एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन

Share

सर एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन कष्टकरी कामगारांना समर्पित केला पाहिजे. कारण ते नसते तर इंजिनीयरांचे ड्रॉईंग बॉक्समध्येच शिल्लक राहिले असते. कष्टकरी, कामगार हे देशाचा कणा आहेत असे उद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढले.

बेंगळुरात बुधवारी सर एम. विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. त्यावेळी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या पुतळ्याला चंदन नामक आयटीआय उत्तीर्ण विध्यार्थ्याला मुख्यमंत्र्यांनी पुष्पहार अर्पण करायला लावला. यावेळी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या १६१व्या जन्मदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले. बी. ई. पदवीधर असलेले मुख्यमंत्री म्हणाले, मला इंजिनियर बोम्मई म्हटले की, आनंद होतो. सर एम. विश्वेश्वरय्या श्रमजीवी होते. इतक्या वर्षांनंतरही त्यांची आपण आठवण काढतो. आज राज्याला आणखी एक सर एम. विश्वेश्वरय्या हवे आहेत.

सरकारी विकास कामांत अडचणी आल्यास सर एम. विश्वेश्वरय्या असते तर त्यांनी त्या कशा सोडविल्या असत्या याची कल्पना करून आपण काम केले पाहिजे. स्वतःचे घर बांधताना आपण दर्जाविषयी जागरूक असतो. तशीच जागरूकता सरकारी विकासकामे करताना दाखवली पाहिजे. सरकारचा पैसे हा जनतेचा पैसे आहे हे समजून घेऊन काम केले पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले. याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: