सरकारची तिजोरी रिकामी नसून मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले. कित्तूर मतदारसंघातील नव्या कादरवळ्ळी गावात चार कोटी रुपये खर्चून काँक्रिट रस्ते बांधण्याच्या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

राज्य सरकारकडे विकासकामांसाठी निधी नसल्याची टीका भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांकडून केली जात आहे. मात्र, मतदारसंघातील विकासकामे सुरूच राहणार असून निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे आमदारांनी सांगितले.


नव्या कादरवळ्ळी गावातील प्रत्येक गल्लीमध्ये चांगले काँक्रिट रस्ते बांधण्याच्या उद्देशाने चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

विरोधकांनी टीका करत राहावे, आम्ही विकासकामे सुरू ठेवू. मतदारसंघातील प्रत्येक गावाला कोट्यवधींचा निधी मिळत असून कोणत्याही गावात निधीची कमतरता भासू देणार नाही. जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर झाले असून काही ठिकाणी आरक्षणासंदर्भात अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. निवडणुकीसंदर्भातील पुढील प्रक्रिया निवडणूक आयोग पाहील. आगामी अधिवेशनात कोणत्याही आमदाराशी भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक दिली जाईल, अशी भूमिका आमदार बाबासाहेब पाटील यांनी मांडली.

वार्ताहर : शानूल मत्तेखान, कित्तूर


Recent Comments