Kittur

हुलीकट्टी रस्त्यासाठी २.७० कोटींचा निधी मंजूर

Share

कित्तूर मतदारसंघातील हुलीकट्टी गावाच्या रस्त्याच्या विकासासाठी २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला.

अनेक वर्षांपासून हा रस्ता खराब अवस्थेत होता. हुलीकट्टी गावाला कित्तूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या या रस्त्याच्या विकासाची मागणी ग्रामस्थांकडून होत होती. निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. दर्जेदार कंत्राटदाराकडे काम सोपविण्यात आले असून, रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.

आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, या भागातील नागरिकांची रस्ते विकासाची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. काहीसा विलंब झाला असला तरी २.७० कोटींचा निधी उपलब्ध करून कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे. कामाचा दर्जा राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कित्तूर मतदारसंघातील निच्चणकी गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याची बातमी प्रसारित झाली होती. यावर प्रतिक्रिया देताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी, दोन ठिकाणी निकृष्ट काम झाल्याचे निदर्शनास आले असून, संबंधितांवर तातडीने कारवाई केली जाईल. तसेच संबंधित निधी रोखण्यात येईल, असे स्पष्ट केले.

आगामी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याचेही आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.

वार्ताहर : शानूल मत्तेखान, कित्तूर

Tags: