Hukkeri

हुक्केरीत उत्साही राज्योत्सव समितीचा भव्य राज्योत्सव सोहळा

Share

हुक्केरी शहरात उत्साही राज्योत्सव समितीच्या वतीने कर्नाटक राज्योत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वाद्ये, सांस्कृतिक देखावे आणि डीजेच्या तालावर युवकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला.

अडवी सिद्धेश्वर मठाच्या आवारात हुक्केरी हिरामठाचे चंद्रशेखर महास्वामीजी आणि मंजुनाथ महाराज यांच्या सान्निध्यात नाडदेवी भुवनेश्वरीच्या प्रतिमेचे उद्योजक पवन कत्ती यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर नाड, भाषा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या देखाव्यांसह पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला प्रारंभ झाला.

राज्योत्सवानिमित्त सांस्कृतिक वाद्यांसोबतच युवकांसाठी डीजेची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने शांततेत सहभागी व्हावे, असे आवाहन उद्योजक पवन कत्ती यांनी केले.

मिरवणूक कोर्ट सर्कल येथे पोहोचल्यानंतर आमदार निखिल कत्ती आणि विद्युत सहकारी संघाचे संचालक विनय पाटील यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या मिरवणुकीत युवकांनी नृत्य केले.

गेल्या सहा वर्षांपासून उत्साही राज्योत्सव समितीच्या माध्यमातून जात-धर्मभेद बाजूला ठेवून ज्येष्ठ नागरिक आणि युवक एकत्र येत राज्योत्सव साजरा करत असल्याचे विद्युत सहकारी संघाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी सांगितले.

या मिरवणुकीत हुक्केरी तालुक्यातील हजारो कन्नडप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.

राजू बागलकोटी इन न्यूज, हुक्केरी

Tags: