भक्त कनकदास यांचे विचार आणि आदर्श आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत, असे मत हुक्केरी तालुका कुरुब समाजाचे अध्यक्ष जयप्रकाश करजगी यांनी व्यक्त केले. हुक्केरी येथे भक्त कनकदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हुक्केरी तालुका प्रशासन आणि हालुमत समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटक प्रदेश कुरुब संघाचे संचालक शंकरराव हेगडे होते. अडवी सिद्धेश्वर मठाच्या आवारात भक्त कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.

क्षेत्र शिक्षणाधिकारी रेवती मठ यांनी कनकदास यांच्या तत्त्वज्ञानाचे आणि आदर्शांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या विचारांची आजही समाजाला गरज असल्याचे नमूद करून त्यांनी सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

हालुमत समाजाचे तालुका सचिव भीमसेन भागी यांनी राज्य सरकारकडे विशेष मागणी केली. कनकदास जयंतीप्रमाणेच दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट रोजी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याबाबत सरकारने आदेश जारी करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मिरवणुकीत ढोलक नृत्य, लहान मुलांचे विविध वेशभूषेतील सादरीकरण आणि वाद्यवृंद सहभागी झाले होते. या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

कुरुब संघाचे तालुका अध्यक्ष जयप्रकाश करजगी यांनी कनकदास हे केवळ हालुमत समाजापुरते मर्यादित नसून सर्व धर्मांसाठी आदर्श असल्याचे सांगितले. त्यांचे विचार आणि आदर्श समाजाला योग्य दिशा देणारे आहेत, असे त्यांनी नमूद केले.
त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात चंद्रशेखर महास्वामी आणि मंजुनाथ महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात विद्युत सहकारी संघाचे संचालक गजानन कोळवी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी भीमराव घंटी, सिद्धाप्पा एगण्णवर, हल्लाप्पा कुडबाळप्पगोळ, डॉ. शिवाजी गोटूर, सिदराव ढवळेश्वर, मुक्तार नदाफ, रायाप्पा हेगडे, सुभाष केसरकर, अशोक डुम्मनवर, एस. नंजुंडप्पा, शानूल तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
राजू बागलकोटी इन न्यूज, हुक्केरी


Recent Comments