Chikkodi

केरूर क्रॉसजवळ अज्ञात व्यक्तीची आत्महत्या

Share

चिक्कोडी तालुक्यातील केरूर क्रॉसजवळ गॅस कार्यालय परिसरात झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर अंकली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी किंवा यासंदर्भात माहिती असणाऱ्यांनी तातडीने अंकली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Tags: