भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग प्रशस्त करणारे दिशादर्शक आहे, असे मत महानगरपालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी व्यक्त केले. बेळगाव महानगरपालिकेत आयोजित संविधान दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
विविधतेत एकता असलेल्या भारतात सर्व धर्मीयांना सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या तत्त्वांनुसार समान स्थान देणारे संविधान जगासाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रत्येक नागरिकाने अंगीकार करावा. हक्कांचा उपभोग घेतानाच कर्तव्येही योग्य प्रकारे पार पाडून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन कार्तिक एम. यांनी केले.

नगरसेवक संदीप जिरग्याळ यांनी संविधान हे राष्ट्राचा भक्कम पाया असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी सत्ताधारी पक्षाचे गटनेते संतोष पेडणेकर, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष, सदस्य व नगरसेवक, उपआयुक्त उदयकुमार बी. टी., महसूल विभागाचे उपआयुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी, विकास विभागाच्या उपआयुक्त लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments