Belagavi

गोवावेस सर्कलवरील अपघातप्रवण ठिकाणाची दुरुस्ती

Share

गोवावेस सर्कल परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि रस्त्यांमधील अंतरामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला होता. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनंतर नगरसेवक नितीन जाधव यांनी खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

गोवावेस सर्कल परिसरातील रस्त्यांवरील खड्डे आणि दोन रस्त्यांमधील अंतरामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. या ठिकाणी वारंवार अपघातही होत होते. ही बाब वाहतूक पोलिसांनी नगरसेवक नितीन जाधव यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

त्यानंतर प्रभाग समिती आणि वाहतूक पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले. अपघातांचा धोका असलेल्या गोवावेस सर्कलमधील ठिकाणाची दुरुस्ती करण्यात आली असून, प्रभागातील उर्वरित खड्डेही टप्प्याटप्प्याने बुजवण्यात येतील, अशी ग्वाही नितीन जाधव यांनी दिली.

Tags: