Chikkodi

अंकलीच्या निकीताची वैज्ञानिक पदावर भरारी

Share

अंकली येथील निकीता कंकणवाडी हिची भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत केंद्रीय रेशीम मंडळात ‘वैज्ञानिक-बी’ पदावर नियुक्ती झाली आहे. वरिष्ठ संशोधन फेलोशिप (एसआरएफ) परीक्षेत तिने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

रेशीम उत्पादन (सेरीकल्चर) विषयात एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केलेल्या निकीताने कठोर परिश्रम आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर तिची केंद्रीय रेशीम मंडळातील वैज्ञानिक पदासाठी निवड झाली. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

निकीता हिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, ग्रामस्थ, शिक्षक आणि चिक्कोडी परिसरातून आनंद व्यक्त करण्यात येत असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: