बेळगाव येथील आर्यन लिंगराज मगदूम याने कराटे क्रीडा प्रकारात मानाचा ब्लॅक बेल्ट मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्याने ही कामगिरी केली आहे.
आर्यनने २०२१ मध्ये कराटे प्रशिक्षणाला सुरुवात केली. बेळगावातील जाधवनगर येथील फ्लाइंग फीट स्पोर्ट्स अकादमीत चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमित प्रशिक्षण घेत आहे. शिस्त, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि कराटेप्रती असलेल्या आवडीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित विशेष ब्लॅक बेल्ट प्रदान समारंभात विनायक मोरे, चेतन मोरे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्याला ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला.

आर्यन सध्या बेळगावातील सेंट पॉल्स जेसुइट शाळेत शिक्षण घेत आहे. शैक्षणिक अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही तो आपली गुणवत्ता सिद्ध करत आहे.
कमी वयात मिळवलेले हे यश त्याच्या मेहनतीचे, आत्मविश्वासाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. आर्यनची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Recent Comments