राज्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पोलीस विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार सिंह यांनी बेळगावला भेट देऊन उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली.

या बैठकीला उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, बेळगावचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम, हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख रामराजन उपस्थित होते.


याशिवाय गदग, बागलकोट, हावेरी, विजयपूर आणि धारवाड जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षकही बैठकीत सहभागी झाले होते.
बैठकीत विभागातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण, पोलीस विभागाचे कामकाज आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एडीजीपी विजयकुमार सिंह यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यासाठी कडक सूचना दिल्या.


Recent Comments