चिक्कोडी शहराबाहेरील हालट्टी येथे तीन घरांमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत ४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तू लंपास करण्यात आल्या.
काकासाहेब बसाप्पा चन्नवर, मारुती बसाप्पा चन्नवर आणि बसवराज नेसरगी यांच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश केला आणि दागिन्यांसह इतर मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला.

दुसऱ्या दिवशी दुपारी घरमालक घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी श्वानपथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी चिक्कोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments