Chikkodi

येडूर येथे सप्तमातृका देवी यात्रा आणि मंदिर वास्तुशांती

Share

चिकोडी तालुक्यातील येडूर टेक येथे सप्तमातृका देवीची यात्रा आणि नूतन मंदिराचा वास्तुशांती सोहळा श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या मंदिराच्या बांधकामासाठी आमदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून ९ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. कार्यक्रमाला केरूर शंकरलिंग मठाचे केदारिगौड पाटील आणि प्रवचनकार बाळगौड पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

व्यासपीठावर शिवानंद करोशी, महेश कागवाडे, अप्पासाहेब बेळवी, विजय जाधव, संजय पाटील, जयपाल बोरगावे, गोपी कागवाडे, मल्लय्या जडे आणि विजय पाटील उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मंदिराच्या उभारणीसाठी आमदार हुक्केरी पिता-पुत्रांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यात आला.

सकाळी मंगलवाद्यांच्या गजरात कुंभ मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सप्तमातृका देवीची विधिवत विशेष पूजा करण्यात आली.

यावेळी राजेंद्र हेब्बूर, अप्पासाहेब कोळी, विजय तावदारे, शिवानंद बेळवी, पोपट किल्लेदार, राजू नंदगावे, संतोष कोळी आणि भाऊसाहेब बोरगावे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पोपट किल्लेदार यांनी स्वागत केले, तर अप्पू खोत यांनी आभार मानले. सायंकाळी कीर्तनसेवा झाली.

Tags: