पत्रकार आपल्या लेखणीतुन समाजातील आडीआडचणी, ज्वलंत समस्या, व वास्तव लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात, एकंदरीत समाज चांगला घडविण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पत्रकारांची भुमीका अत्यंत महत्वाची असते.
तसेच डाॅक्टर सुध्दा पत्रकाराप्रमाणे रुग्णांचे प्राण वाचवुन समाज निरोगी बनविण्याचे काम करतात, पत्रकार व डाॅक्टर याची भूमिका तितकीच महत्वाची आहे.

त्यामुळे दोन्ही ही घटक समाजात विश्वास व सहकार्याचे नाते जोडण्याचा प्रयत्न करतात.
असे विचार खानापूर डाँक्टर असोसिएशनचे चेअरमन डाॅ.डी ई नाडगौडा यानी जागतिक पत्रकार दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशन यांच्यावतीने खानापूर येथील वनमाला हाॅटेलच्या सभागृहात पत्रकाराचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाचे औचित्य साधुन डाॅक्टर असोसिएशन जेष्ठ सल्लागार व कायदे तज्ञ्ज्ञ अँड आय आर घाडी यांचा ही सत्कार करण्यात आला .
प्रारंभी डाॅक्टर असोसिएशनचे डाॅ शंकर पाटील यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले .
कार्यक्रमाची सुरूवात उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी बोलताना कायदे तज्ञ्ज्ञ अँड आय आर घाडी म्हणाले की, पत्रकार व डाॅक्टर हे दोन्ही घटक समाजाला वरदान आहेत.
पत्रकार हे समाजाला चांगल्या मार्गाने जाण्याचा रस्ता दाखवतात, तर डाॅक्टर हे समाजाला अरोग्यदायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात, दोन्ही माध्यमाची भुमीका ही फार महत्वाची आहे.
यावेळी पत्रकारानी आपले विचार व्यक्त केले.
डाॅक्टर असोसिएशनच्यावतीने पत्रकार विवेक गीरी, प्रसन्ना कुलकर्णी, पिराजी कुर्हाडे, वासुदेव चौगुल, संदीप सुतार, अप्पाजी पाटील, सुहास पाटील , विलास कवठणकर, हणमंत गुरव आदी पत्रकारांचा जागतिक पत्रकार दिनाचे औचित्य साधुन शाल, पुष्पहार व मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जेष्ठ डाॅक्टर त्याचबरोबर उपस्थित असलेले सामाज सेवक विनायक मुतगेकर यांचा ही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व डाॅक्टर, पत्रकार तसेच समाज सेवक उपस्थित होते.
शेवटी आभार डाॅ, वैभव पाटील यानी मानले.


Recent Comments