खानापूर तालुक्यातील घोटगाळी येथे युवकांच्या पुढाकारातून हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी तालुका मार्केटिंग सोसायटीचे संचालक रफीक हलशीकर उपस्थित होते.
रफीक हलशीकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात रस घेऊन आपल्यातील कौशल्याला वाव द्यावा. त्यांच्या क्रीडा प्रवासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील खेळाडूंमुळे गावाची ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी युवक आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.


Recent Comments