DEATH

संतीबस्तवाड येथील शट्टप्पा कर्लेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Share

बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड येथील रहिवासी शट्टप्पा रामा कर्लेकर (वय ७२) यांचे बुधवारी (ता. २५) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
शेतामध्ये पिकाला पाणी सोडण्याचे काम करीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संतीबस्तवाड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, दोन मुलगे, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या सकाळी ८ वाजता संतीबस्तवाड येथील स्मशानभूमीत होणार आहे.

Tags: