विजयनगर जिल्ह्यातील होसपेट तालुक्यातील बुक्कसागर गावाजवळ कालव्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. पोहण्यासाठी कालव्यात उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली.
कुरुगोडू तालुक्यातील एच. वीरापूर येथील १६ आणि १२ वर्षांचे दोन बालक हुलिगेम्मा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. परतताना ते बुक्कसागर येथील आजीच्या घरी थांबले होते.

यावेळी दोघेही गावाजवळील कालव्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. स्थानिकांनी शोध घेऊन दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.
घटनेची माहिती मिळताच कमलापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments