अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात, या मागणीसाठी धारवाड येथे शेकडो शिक्षकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारविरोधात शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुदानित शाळा शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली तंबू उभारून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी शिक्षकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी यापूर्वी अनेकदा सरकारकडे निवेदने दिली आहेत. मात्र, सरकारकडून त्यांच्या मागण्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी आंदोलक शिक्षकांनी व्यक्त केली.

राज्य सरकारने अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या समस्या आणि विविध मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्या तातडीने सोडवाव्यात. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला.


Recent Comments