विजयनगर जिल्ह्यातील होसपेट तालुक्यात ऊसतोडीसाठी मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर कालव्यात कोसळला. या अपघातात ट्रॅक्टरमधील १५ ते २० मजूर सुदैवाने बचावले असून, मोठी दुर्घटना टळली.
कड्डीरामपूर तांडा येथून ऊसतोडीसाठी मजुरांना घेऊन ट्रॅक्टर जात होता. मलपानगुडी तांडा परिसरातील कालव्यावरील रस्त्यावरील हंप्स ओलांडताना ट्रॅक्टरचे इंजिन आणि ट्रॉली यांना जोडणारा भाग तुटला. त्यामुळे इंजिन आणि ट्रॉली दोन्ही कालव्यात कोसळले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच होसपेट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments