विश्वशांती, वेळेवर पाऊस आणि देशात सुख-समृद्धी नांदावी, या संकल्पाने उगार येथील अय्यप्पा भक्त सोमीनाथ हूगार यांनी वैष्णोदेवी ते शबरीमला अशी सहा हजार किलोमीटरची सायकल यात्रा सुरू केली आहे.
उगार बुद्रुक येथील श्री मुरुगुबाई देवी मंदिरात रविवारी यात्रेपूर्वी धार्मिक विधी करण्यात आले. सदलगा येथील रवी गुरुस्वामी यांनी पूजा केली.


सोमीनाथ हूगार हे गेल्या नऊ वर्षांपासून शबरीमला येथे अय्यप्पा स्वामींच्या दर्शनासाठी जात आहेत. यापूर्वी त्यांनी उगार, अयोध्या आणि केदारनाथ येथून शबरीमलापर्यंत यात्रा केल्या आहेत. आता वैष्णोदेवी ते शबरीमला असा सायकल प्रवास करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
सदलगा येथील दरेश्वर अप्पाजी यांनी सोमीनाथ हूगार यांना आशीर्वाद देऊन यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या संकल्पातून तरुणांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिरगुप्पी येथील डॉ. अमूल शरडे यांनीही सोमीनाथ यांच्या भक्तीभावाचे आणि जिद्दीचे कौतुक केले. त्यांच्या या उपक्रमातून परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी शेडबाळ येथील सागर कलाल, अप्पू पुजारी आणि सोनू कलाल यांच्यासह अय्यप्पा भक्त उपस्थित होते.
यानंतर सोमीनाथ हूगार यांनी वैष्णोदेवीकडे जाण्यासाठी उगार येथून प्रवास सुरू केला.
सुकुमार बन्नुरे, इन न्यूज, कागवाड


Recent Comments