Chikkodi

चिक्कोडीत राज्योत्सव मिरवणुकीत पारंपरिक लोककलांची रंगत

Share

चिक्कोडी तालुका प्रशासन, राज्योत्सव समिती आणि विविध कन्नड संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी शहरात राज्योत्सवानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली.

उपविभागाधिकारी सुभाष संपगावी यांच्यासह मान्यवरांनी भुवनेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ केला. पारंपरिक लोककला आणि कलापथकांनी मिरवणुकीत रंगत आणली.

गांधी चौकातून निघालेली मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गस्थ झाली. विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यावेळी तहसीलदार राजेश बुर्ली, मुख्याधिकारी जगदीश इट्टी, सोमणाथ पाटील, राजशेखर खनदाळे यांच्यासह स्थानिक मान्यवर, कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: