बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या रॅलीला विरोध करण्यासाठी उतरलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने गोगटे सर्कल परिसरात तणाव निर्माण झाला.

कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर रॅलीला विरोध करत करवेच्या शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. रॅली रोखण्यासाठी पुढे आलेले वाजिद हिरेकोडी यांच्यासह दहाहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले.


यावेळी वाजिद हिरेकोडी यांनी, छत्रपती शिवाजी महाराज हे कन्नडिगांचेही अभिमानाचे प्रतीक असून, महाराष्ट्र एकीकरण समिती त्यांच्या नावाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप केला. राज्योत्सवाच्या वेळी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये आणि जिल्हा प्रशासनाने अशा उपक्रमांना परवानगी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

परिसरातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.


Recent Comments