धारवाड जिल्ह्यातील नवलगुंद तालुक्यातील गुम्मगोळ येथे कन्नड राज्योत्सवानिमित्त ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कन्नड साहित्यिकांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून राज्योत्सव साजरा करण्यात आला.

ग्रामस्थांनी एकत्र येत कुंभमेळा आणि पावली नृत्य पथकांच्या मिरवणुकीतून साहित्यिकांच्या मूर्ती आणल्या. त्यानंतर त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली.


मिरवणुकीत विविध वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी लक्ष वेधले. गावभर काढलेल्या मिरवणुकीत कन्नड भाषेचा गौरव करण्यात आला. कन्नड संघटनांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक तसेच शाळा विकास समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य सहभागी झाले होते.



Recent Comments