चिक्कोडी तालुक्यातील निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावरील चिंचणी टोल नाक्याजवळ ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी शेळ्या-मेंढ्या रस्त्यावर आणून अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले.
प्रतिटन उसाला किमान ५,५०० रुपये दर जाहीर करावा, अशी आग्रही मागणी करत शेतकरी नेत्यांनी सरकार आणि साखर कारखाना मालकांच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. रस्त्याच्या मध्यभागी शेळ्या-मेंढ्यांसह ठिय्या मांडल्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

गेल्या हंगामात पुरवलेल्या उसाची उर्वरित थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. कर्ज काढून पिकवलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला असून सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा येत्या दिवसांत अधिक तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले.


Recent Comments