महाराष्ट्रात अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणारा ३० क्विंटल रेशनचा तांदूळ चिक्कोडी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला.
बोरगावमार्गे टेम्पोतून इचलकरंजीकडे नेला जाणारा सुमारे ६६ हजार रुपये किमतीचा हा तांदूळ शामनवाडी येथील विनायक कमते यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे. अन्न विभागाचे अधिकारी अभिजित गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सदलगा, मंगूर आणि बोरगाव परिसरात अन्न विभागाकडून तपासणी आणि कारवाई सुरू आहे.
रेशनचा तांदूळ स्थानिक नागरिक आणि किराणा दुकानांकडून प्रतिकिलो २२ रुपये दराने खरेदी करून महाराष्ट्रात ३५ रुपये दराने विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या काळाबाजारात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या कारवाईवेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अधिकारी आकाश फुगरे आणि व्यंकटेश माने उपस्थित होते.


Recent Comments