Vijayapura

ऊस दर निश्चितीपूर्वी ऊस वाहतुकीला शेतकऱ्यांचा विरोध; तिडगुंडी टोलनाक्याजवळ ट्रॅक्टर अडवला

Share

चालू हंगामातील उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तिडगुंडी टोलनाक्याजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून तीव्र निदर्शने केली.

केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर ऊस दराबाबत बैठक होऊन दर घोषित होईपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, असा निर्णय झालेला असतानाही कन्नूर भागातून ऊस तोडणी करून तो महाराष्ट्रात वाहतूक केला जात असल्याचे समोर आले. तिडगुंडी टोलनाक्याजवळ हा ट्रॅक्टर अडवून शेतकऱ्यांनी दर निश्चित होईपर्यंत उसाची वाहतूक करू नये, असा सज्जड दम दिला.

यावेळी आंदोलकांनी ट्रॅक्टर पेटवून देण्याचा इशारा दिल्याने ऊस वाहतूकदारांनी ट्रॅक्टरसह माघार घेत शेताकडे कूच केले. लवकरात लवकर योग्य दर जाहीर न झाल्यास राज्यभरात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेने दिला आहे.

वार्ताहर:
विजयकुमार सारवाड
विजापूर

Tags: