चिक्कोडी तालुक्यातील सिद्धापूरवाडी गावाजवळ चिक्कोडी-मिरज मार्गावर महिंद्रा थार आणि बाईक यांच्यात भीषण अपघात होऊन बाईकवरील दांपत्य गंभीर जखमी झाले.
अपघाताच्या तीव्रतेमुळे बाईकवरून खाली पडल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

सुधाकर रोकडे व स्वप्ना रोकडे अशी जखमी दांपत्याची नावे आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ चिक्कोडी येथील के.एल.ई. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंकली पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अंकली पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments