शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि कृषी सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावात नवीन शेतकरी संघटनेचे उद्घाटन करण्यात आले.

तिगडी गावात ५० ते ६० हून अधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत नवीन शेतकरी संघटनेचा उद्घाटन सोहळा पार पडला. दीपप्रज्वलन व नामफलकाचे अनावरण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शेतकरी गीताच्या गायनानंतर पूज्य स्वामीजींच्या हस्ते शेतकऱ्यांना हिरवा शाल पांघरून दीक्षा देण्यात आली.


शेतकऱ्यांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी गावपातळीवर संघटना मजबूत झाल्या पाहिजेत. केवळ संघटना स्थापन न करता शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून सरकारी योजना पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम झाले पाहिजे, असे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले.
कार्यक्रमात वीरेश्वर महास्वामीजी, श्रीकृष्णप्पा महाराज, मातोश्री शिवयोगिनी देवी, कर्नाटक राज्य शेतकरी संघाच्या महासंघाचे अध्यक्ष बीरप्पा देशनूर, कार्याध्यक्ष बसनगौडा पाटील , विविध शेतकरी नेते तसेच तिगडी गावातील नवीन शेतकरी संघाचे अध्यक्ष अडिवेप्पा दळवाई, उपाध्यक्ष सोमलिंग मुद्दण्णावर यांच्यासह ग्रामस्थ व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments