हुबळी येथे आयोजित दांडिया कार्यक्रमात परधर्मीयांना प्रवेश देण्यात आल्याचा आरोप करत बजरंग दल आणि श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तीव्र विरोध दर्शवला.

या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केशवापूर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.


दांडिया उत्सवात परधर्मीय तरुणांना प्रवेश देण्यात आल्याचा दावा करत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जोरदार निदर्शने केली. यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
घटनेची माहिती मिळताच केशवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन वातावरण शांत केले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


Recent Comments